भारत सरकार राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
(022) 22846720, 22886950, 22045075
(022) 22846721
sec.mh@gov.in

Shri. Jageshwar S. Saharia

श्री. जगेश्वर एस. सहारिया

राज्य निवडणूक आयुक्त

“लोकसभा व विधानसभेच्या निवडणूक व आचारसंहीता याबाबत कृपया मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र शासन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा - दुरघ्वनी क्रमांक ०२२-२२०२१९८७/ हेल्प लाइन क्रमांक १८००२२१९५0/ फॅक्स : 022-22835698 वेबसाईट- ceo_maharashstra.gov.in”

राज्य निवडणूक आयोगाबद्दल

भारतीय संविधानाच्या 73 व 74 दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दि.26 एप्रिल, 1994 रोजी करण्यात आली. संविधानातील भाग -9 मधील अनुच्छेद 243 ट (243 K) नुसार ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हापरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत) व अनुच्छेद 243 यक (243 ZA) नुसार नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत) यांच्या निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे. संविधानातील सदर अनुच्छेदातील तरतुदीनुसार ‘निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण आणि अशा निवडणुकांचे आयोजन ’ अशी जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविलेली आहे.

मानचिन्ह