
बीटेक (इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी)-विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्ही.एन.आय.टी.) (1987),
एमटेक (संगणकशास्र) - आयआयटी खरगपूर (1989)
एमएस्सी (विकास व प्रकल्प नियोजन) -ब्रॅडफोर्ड युनिर्व्हसिटी, युके (2007).
भारतीय प्रशासकीय सेवेतील 1994 च्या तुकडीचे अधिकारी असलेले श्री. वाघमारे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून दि.२८ जानेवारी २०२५ रोजी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
श्री. वाघमारे यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी राज्यात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. अपर मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन; प्रधान सचिव, गृह विभाग (अपील आणि सुरक्षा), महाराष्ट्र शासन; प्रधान सचिव, ऊर्जा विभाग, महाराष्ट्र शासन; अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण); प्रधान सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन; आयुक्त-पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई महानगरपालिका; व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ; विभागीय आयुक्त, अमरावती; सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ-नागपूर; अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नागपूर; व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ; सभापती, नागपूर सुधार प्रन्यास; जिल्हाधिकारी-बुलढाणा; मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद- यवतमाळ व वाशिम, सहायक जिल्हाधिकारी, रत्नागिरी याप्रमाणे विविध पदे भुषविली आहेत.
श्री. वाघमारे यांना स्कॉच गोल्ड अवॉर्ड (विद्युत शक्ती व उर्जा), नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड, सीएसआर इंडिया 2021 अवॉर्ड, पीएसयू अवॉर्ड फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ग्रीनटेक लीडिंग डायरेक्टर अवॉर्ड 2021, सत्येन मित्रा नॅशनल अवॉर्ड (साक्षरोत्तर अभियान) इत्यादी पुरस्कारांनी वेळोवेळी गौरविण्यात आले आहे.
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी राज्य निवडणूक आयोग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.